बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ‘ब्लू टिक’ ट्विटरने रिस्टोअर केले असून याप्रकरणी अभिताभ बच्चन यांनी मजेशीर पद्धतीने ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे आभार मानले आहेत. याआधी ट्विटवरने त्यांचं ब्लू टिक काढलं होतं. पेड सर्व्हिस सुरु झाल्याने त्यांच्यासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर अनेक सेलिब्रिटींचं ब्लू टिक काढण्यात आलं होतं.
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटलं की, “अरे मस्क भाई! आम्ही तुमचे खूप आभारी आहोत! माझ्या नावासमोर ब्लू लोटस (ब्लू टिक) जोडले गेले आहे! आता तुम्हाला काय सांगू भाऊ? मला एखाद गाणं गाऊ असं वाटतंय, ऐकायला आवडेल का? बरं ऐका “तू चीज बडी है मस्क मस्क … तू चिज बडी है मस्क”.
ट्विटरने यापूर्वी पेड सबस्क्रिप्शन सेवा लागू करण्याची घोषणा केली होती, जी मायक्रोब्लॉगिंग साइटवर ब्लू व्हेरिफिकेशन बॅजसाठी 8 डॉलर्स आकारते. ज्यांनी वेळेवर पेमेंट केले नाही किंवा सेवा खरेदी केली नाही, त्यांच्या हँडलवरील निळ्या रंगाचे टिक चिन्ह काढून टाकण्यात आले.
T 4624 –
ए Musk भैया ! बहुत बहुत धन्यवाद देत हैं हम आपका !
उ , नील कमल ✔️ लग गवा हमार नाम के आगे !
अब का बताई भैया ! 😁
गाना गये का मन करत है हमार !
सनबो का ?
इ लेओ सुना :
"तू चीज़ बड़ी है musk musk … तू चीज़ बड़ी है, musk " 🎶— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023