भ्रष्टाचार करणाऱ्याला नोटीस काढणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाला ED ला चक्क नोटीस आली असून आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह नोटीस दिली आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि कथित अबकारी घोटाळा प्रकरणात चौकशी करत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनाच ही नोटीस पाठवली असून ४८ तासांच्या आत माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा, असे या नोटिशीत म्हटले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्रात माझं नाव समाविष्ट केले आहे. कोणत्याही साक्षीदारानं माझं नाव घेतलेलं नाही. तरीही या प्रकरणात माझं नाव घेतलेले आहे. ईडी माझी बदनामी करण्यासाठी कट रचून माझं नाव घेत आहे असे दिसतेय. माझ्या विरोधात कोणीही साक्ष दिलेली नाही आणि माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही, असे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.
