जळगाव अजितदादा यांच्यात क्षमता आहे. ते अनुभवी आहेत. अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, असं सांगतनाच लायकी नसताना काही लोक मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे.
जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांची मुलाखत ऐकली नाही. काय आहे त्यात मला माहीत नाही. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? त्यांच्यात क्षमता आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. अनेक वर्ष मंत्री आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले. एखाद्याच्या भाग्यात लिहिलं असेल तर होत असतात. माझ्या अजितदादांना शुभेच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.