शाहरुखच्या ‘पठाण’ पुढे फिका पडला सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’; पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? वाचा सविस्तर
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. पण सलमानचा सिनेमा आणखी जास्त कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जात होता.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 15.81 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे एकंदरीतच शाहरुखच्या ‘पठाण’ पुढे सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा फिका पडला आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असल्याने या सिनेमाकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.