माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २२ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी-शेगदारमळा येथे आज (दि. २१ एप्रिल २०२३) रोजी सकाळ च्या दरम्यान लांडग्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला करत ५ बोकडे ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी-शेगदारमळा येथे ज्ञानेश्वर संतू कोळेकर यांची शेती आहे. याठिकाणी ते राहण्यास असून त्यांचा शेळ्यांचा कळप आहे. आज आटपाडी चा आठवडी बाजार असल्याने त्यांनी त्यांच्या कळपातील सात बोकडा पैकी २ बोकडे विक्री करण्यास बाजारात गेले असता लांडग्याने त्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये पाच बोकडे ठार झाली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
