माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २१ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी नगरपंचायतच्या महिला कर्मचाऱ्यास मोटार सायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्या असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी नगरपंचायतीच्या महिला सफाई कर्मचारी श्रीमंती लक्ष्मीबाई पिराजी खंदारे वय ६० या आटपाडी बस स्थानक परिसरातील राऊत हॉस्पिटलच्या शेजारी रस्त्यालगत सफाईचे काम करत होत्या.

यावेळी आरोपी सौरभ मारुती पाटील हा भरधाव वेगाने मोटारसायकल (MH10BJ1615) वरून येत लक्ष्मीबाई खंदारे यांना धडक दिली. यामध्ये त्या जखमी झाल्या. याप्रकरणी लक्ष्मीबाई खंदारे यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून सौरभ मारुती पाटील (रा. गवरचिंचमळा) याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.