‘बहरला हा मधुमास’ हे गाणे गायले आहे “या” प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेने : रील्सही प्रचंड व्हायरल होत आहेत : तुम्ही बघितले का गाणे?
सोशल मिडीया इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुकवर सध्या एकच गाणं कानी पडत आहे ते म्हणजे ‘बहरला हा मधुमास’. या गाण्याने चाहत्यांना अगदी वेड लावलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील रील्सही प्रचंड व्हायरल होत आहेत.
बहुप्रतीक्षीत ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील हे गाणं असून केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असणार आहे. महाराष्ट्राचे रत्न शाहीर साबळे यांच्या जीवनाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं नृत्य दिग्दर्शन कृति महेशने केलं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.