Latest Marathi News

BREAKING NEWS

दोनशे रुपयेच्या उधारीवरून तरुणाचा खून

0 1,022

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात गणेश नामदेव संकपाळ ( वय ४०, रा. गणेश कॉलनी, उचगाव) याचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने वार करून सिमेंटच्या पाइपचा तुकडा डोक्यात घालून हा खून करण्यात आला. पानपट्टीच्या पैशाच्या उधारीवरून संकपाळ याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

याप्रकरणी विकी ऊर्फ वेंकटेश संजय जगदाळे (वय २४ ), रतनकुमार रमेश राठोड (वय २० ) , ओम गणेश माने (वय २१, तिघे रा. उचगाव, ता करवीर), रोहन गब्बर कांबळे (वय २०, रा टेंबलाई नाका, रेल्वे फाटक, कोल्हापूर ) करण राजेंद्र पुरी (वय २३, रा. रेस कोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर ) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद पत्नी दैवशाला गणेश संकपाळ यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली.

Manganga

 

अधिक माहिती अशी, गणेश संकपाळ याला दारू पिण्याचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी त्याने व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. बुधवारी तो सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तब्येत बिघडली आहे डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन येतो असे घरात सांगून निघून गेला होता.

 

रात्री साडेदहाच्या सुमारास विकी जगदाळे याच्या पानटपरीतून सिगारेटचे पाकीट उधार घेऊन गेला होता. बराच वेळ उधारी देण्यासाठी आला नाही. उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मित्रांसमवेत संशयित गेले असता त्यांच्यात वादावादी होऊन धारदार शस्त्राने आणि सिमेंटच्या पाइपने त्याला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!