Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : खरसुंडी येथे तीन ठिकाणी घरफोडी : एक तोळ्याची कर्णफुले लंपास : नागरिकांमध्ये घबराट

0 1,644

माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. २१ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

आटपाडी तालुक्यातील खरसुंडी हे महत्त्वाचे गाव आहे. या ठिकाणी श्री. सिद्धनाथ देवाची चैत्री यात्रा नुकतीच संपन्न झाली. आज दिनांक २१ च्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोडी केली.

Manganga

याबाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी, बायाक्का शंकर जावीर यांच्या घरामध्ये घरफोडी करत त्यांची एक तोळ्याची कर्णफुले लंपास करत घरातील साहित्य फेकून देत किराणा मालाची नासधूस केली. त्यानंतर दया भिसे यांच्या घरामध्ये चोर शिरले. या ठिकाणी चोरांनी त्यांच्या साड्यांची चोरी केली. त्यानंतर लाला भिसे यांच्या घरासमोरील गेट तोडले. तर अमित निकम यांच्या घरामध्ये चोर शिरले. परंतु त्यांच्या घरातील लोक जागे झालेवर चोर पळून गेले.

तीन ठिकाणी चोरांनी चोरीचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यावेळी दया श्रीमंत भिसे यांनी लगेच मध्यरात्री  खरसुंडी पोलीस ठाणे येथे धाव घेत सदरची माहिती पोलिसांना देताच या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी पंचनामा केला असून या धाडसी चोरीने नागरिकांच्या मध्ये मात्र घबराट निर्माण झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!