Latest Marathi News

BREAKING NEWS

पेन्शन घेण्याकरिता आजीबाईचा वेदनादायी संघर्ष! खुर्चीचा आधार, अनवाणी पायांनी पायपीट

0 441

 

पेन्शनची रक्कम मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. कधी सरकारी बाबूगिरीमुळे जिवंतपणाचा दाखला द्यावा लागतो. तर कधी कागदपत्राअभावी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात.

 

Manganga

सध्या एका वृद्ध महिलेने पेन्शन गोळा करण्यासाठी चक्क अनवानी पायांनी पायपीट केली. सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं असून, निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी महिलेचा संघर्ष पाहून अनेकांना सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

तुटलेलल्या खुर्चीचा आधार घेत ही वृद्ध महिला रस्त्यावर अनवानी चालत चालली आहे. वय झालेलं असूनही एवढा त्रास घेत तिला बॅंकेत जावं लागले. ओडिशाच्या नबरंगपूर येथील ज्येष्ठ नागरिक सूर्या हरिजन असं या महिलेचं नाव असून या वृद्ध महिलेला तुटलेल्या खुर्चीचा आधार घेऊन अनेक किलोमीटर अनवाणी पायी चालावं लागले. ओडिशाच्या झारीगाव SBI व्यवस्थापक झारीगाव शाखेत तिची पेन्शन गोळा करण्यासाठी महिलेनं एवढी पायपीट केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!