Latest Marathi News

BREAKING NEWS

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात लष्करी वाहनाला भीषण आग : पाच जवानांचा मृत्यू

0 400

दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यामुळे लष्करी वाहनाला भीषण आग लागून पाच जवानांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती नॉर्दन कमांडने दिली आहे.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लष्कराचं वाहन पूंछ जिल्ह्यातील भिंबर येथून संगिओतकडे जात होतं. यावेळी पूंछ-जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर लष्कराच्या वाहनाला आग लागली, या आगीत पाच जवानांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

Manganga

 

पूंछ जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धुक्याचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा वापर केल्यामुळे गाडीला आग लागली, अशी माहिती नॉर्दन कमांडने दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!