Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी तालुक्यातील शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी : आकस्मित निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला चार लाखाची मदत

0 1,210

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० मार्च २०२३ : आटपाडी तालुक्यातील कटरेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण तलवारे यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आटपाडी तालुक्यातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत चार लाख तेहत्तीस हजार पाचशे बारा रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

लक्ष्मण तलवारे यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला होता. परंतु त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने नियमितीकरण प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे शासकीय लाभ मिळतील का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आटपाडी तालुक्यातील सर्व संघटनांनी व गटशिक्षणाधकारी दत्तात्रय मोरे यांनी सर्व शिक्षकांना तलवारे कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

Manganga

या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील शिक्षक, सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी चार लाख तेहत्तिस हजार पाचशे बारा रुपये निधी जमावाला. त्याचा धनादेश आज दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या कुटुंबीयांकडे गटशिक्षाधिकारी मोरे यांच्या हस्ते तलवारे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

या वेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यू.टी.जाधव, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर, संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रसिक सपाटे, नितीन गळवे, संतोष बाड, दीपक कबीर, दत्तात्रय सुतार, राहुल बचुटे, जनार्दन मोटे, नारायण कदम, श्रीकांत कुंभार, मोटे सर,संजय काळेल, सदाशिव पिंजारी, जगदीश खाडे उपस्थित  होते.

h

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!