आपल्याला सोशल मिडियावर गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत पाहायला मिळत आहे. गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांच्या चर्चेतील नाव ठरले आहे. काही दिवसापूर्वी गौतमी पाटीलने तीच्या आयुष्यातील भावी जोडीदाराबद्दल भाष्य केले होते. याच मुद्यावरून एका शेतकरी पुत्राने गौतमी पाटीलला पत्र लिहले आहे.
बीडमध्ये राहणाऱ्या एका किसान पुत्राने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने गौतमी पाटील ला पत्र लिहित पोस्ट शेअर केली आहे.

त्या पत्राद्वारे त्याने म्हणले आहे की, तुझ्या डान्स वर लाखो जण फिदा आहेत पण तुज्यासोबत लग्न करायला एकपण तयार नाही. गौतमी पाटील तुमचे हाल बेहाल, चाहते लाखो पण लग्नाला तयार कोणीच नाही.
आमच्या महाराष्ट्रामध्ये मुलगी लग्नाला आली की, मुलीच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही. आणि मुलीला सुद्धा लग्न कर अशी म्हणायची वेळ येत नाही.
खासदार, आमदार मंत्री मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात अवकाळी पावसाने पिके गेली, मुकी जनावरे गेली तरी काही तरुणवर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही.
इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील, कापसाला बकेटने पाणी मारतील पण तुझ्याशी लग्नाला मात्र कोणीच तयार होणार नाही. असे या शेतकरीपुत्राने पत्रात म्हणले आहे.