आश्चर्यचकित : नाद करा पण आमचा कुठ! केदारनाथ यात्रेसाठी शेतकऱ्याने केली थेट जिल्हाधिकाऱ्याकडे हेलिकॉप्टर तिकीटची मागणी…
चार धामपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथच्या दर्शनाला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण देव दर्शनाला जाण्यासाठी कोणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तिकीटची मागणी केल्याचं तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आले. नसेल पण सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याकडे हेलिकॉप्टरच्या तिकीटची मागणी केली आहे.
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सार्वजनिक तक्रार सुनावणी सुरु असताना चक्क जिल्हाधिकाऱ्याकडे केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टरचे तिकीट मिळावे. अशी अनोखी मागणी केली. शेतकऱ्याची मागणी ऐकून जिल्हाधिकारीही आश्चर्यचकीत झाले. मात्र, नंतर केदारनाथ येथील जिल्हाधिकाऱ्याशी बोलून तुम्हाला तिकीट मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्याला दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने विनंती केली की, ज्या वृद्धांना केदारनाथला जायचे आहे, परंतु त्यांना चालणे किंवा खेचरावर बसणे शक्य नाही, अशा वृद्धांकडून पैसे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून वृद्ध लोकांनाही देवदर्शनासाठी जाता येईल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे अनोखी आणि महत्वपुर्ण मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.