Latest Marathi News

BREAKING NEWS

आश्चर्यकारक: कोणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही! रिक्षा चालक रात्रीत बनला करोडपती

0 975

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपण अशा अनेक बातम्या वाचत असतो. ज्यामध्ये अनेक लोक रात्रीत करोडपती होतात. सध्या अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका रिक्षा चालकाचं नशीब रात्रीत पालटलं आहे.

रात्रीत करोडती झालेल्या व्यक्तीचं नाव गुरदेव सिंह असून ते पंजाबमधील लोहगड गावामध्ये राहतात. गुरदेव यांच्या घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रिक्षा चालवायचे. पण म्हातारपणी का होईना त्यांची कष्टाच्या कामापासून सूटका झाली आहे. कारण रिक्षाचालक गुरुदेव यांनी बैसाखी बंपर लॉटरीमध्ये तब्बल २.५ कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकल्यामुळे ते रात्रीत कोट्यवधीचे मालक बनले आहेत. त्यांनी हे बक्षीस जिंकताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Manganga

 

दरम्यान, गरीब कुटुंबातील गुरदेव सिंग यांनी आजपर्यंत अनेक कष्टाची काम केली, दिवसरात्र रिक्षा चालवली आणि आता अचानक श्रीमंत झाल्यामुळे त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. देव जेव्हा द्यायला सुरुवात करतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो असं म्हटलं जाते. असंच काहीसं मोगाच्या धरमकोटमधील लोहघर गावात राहणाऱ्या गुरदेव सिंग यांच्यासोबत घडलं आणि ते एका रात्रीत करोडपती बनले आहेत.

लॉटरीचे पहिले बक्षीस जिंकल्यानंतर गुरुदेव म्हणाले, “माझी लॉटरी निघेल असे मला कधीच वाटले नव्हते, देवाने माझ्या कष्टाचं कौतुक केलं आहे. या पैशातून मी माझ्या मुलांसाठी घर बांधणार असून नातवांना चांगलं शिक्षण देणार.” रिक्षा चालवण्यासोबतच गुरदेव सिंग स्वत: रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे आणि ये-जा करणाऱ्यांठी चांगला मार्ग तयार करायचे. त्यामुळे त्यांच्या या निस्वार्थ कामाचं त्यांना फळ मिळाल्याचंही अनेकजण म्हणत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!