Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली : मिरजेत मूर्ती विटंबना : मनोरुग्ण महिला ताब्यात

0 811

सांगली : मिरज येथील लक्ष्मी मार्केट परिसरातील हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील दुकाने दुपारपासून बंद ठेवण्यात आली असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे.

लक्ष्मी मार्केटमध्ये महापालिकेच्या अग्निशमन कार्यालयाच्यामागे पूरातन हनुमान मंदिर असून या मंदिरातील मुर्तीची विटंबना केल्याचा प्रकार काही लोकांच्या नजरेस आला. ही माहिती तात्काळ शहरात पसरल्यानंतर हिंदूत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जय श्रीरामच्या घोषणा देत लक्ष्मी मार्केट परिसरात फेरी मारली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने दुपारपासून बंद करण्यात आली. उपहारगृहे, चहा गाडे, ईदनिमित्त पदपथावर विक्रीसाठी बसलेले विक्रेते, भाजीपाला विके्रते यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले.

Manganga

हिंदूत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमले होते. पोलीसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले असल्याचे सांगितल्याने निर्माण झालेला तणाव निवळला असला तरी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. उप अधिक्षक अजित टिके, शहर निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी मुख्य मार्गावर पथसंचलनही केले. पोलीेस अधिक्षिक बसवराज तेली यांनी भेट देउन स्थिती नियंत्रणात असल्याचे आणि संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वा्स ठेवू नये असे आवाहन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!