माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १९ एप्रिल २०२३ : आटपाडी : येथील गोंदिरा येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करत एक लाख २८ हजार रुपयांचे दागिने लंपास केले असून या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी गोंदिरा येथे बाबुराव नाना मेटकरी हे राहतात. दिनांक १८ च्या रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. त्यांच्या घरातील तीन पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कमे सह एक लाख २८ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी आटपाडी पोलिसात बाबुराव नाना मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर चोरीचा तपास पोहेकॉ कदम करत आहेत.