Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी :  श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली नाथनगरीतील स्वच्छता

0 2,015

 

आटपाडी : तालुक्यातील खरसुंडी या गावातील श्री सिद्धनाथाची यात्रा १७ एप्रिल२०२३ रोजी पार पडली.

 

Manganga

या यात्रेसाठी भाविक भक्त खूप लांबून दर्शनासाठी येत असतात. तर काही लोक आपली छोटी मोठी दुकान ही घेऊन वस्तू, खाऊ विकण्यासाठी साठी येत असतात. त्यामुळे नाथनगरीतील परिसर हा गुलाल, प्लास्टिक व इतर घनकचरा यात्रेमुळे अस्वच्छ होत असतो.

 

परंतु आज दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व पर्यावरणाचे विद्यार्थी यांनी मिळून श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्र  मंदिर खरसुंडी येथील संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्याचा उपक्रम योग्य रित्या पार पाडला आहे.

 

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये राष्टीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व पर्यावरणाचे विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे प्रा. सदाशिव मोरे सर, प्रा. गणपतराव नांगरे सर व खरसुंडी गावचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!