Latest Marathi News

BREAKING NEWS

कृष्णा नदीच्या पवित्र पाण्यात मिसळले जातेय सांडपाणी  

0 131

सांगली : कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून उगम पावल्यानंतर १६० किलोमीटर अंतर कापून सांगली जिल्ह्यात येते. सांगली जिल्ह्यात ती १३० किलोमीटर वाहत कर्नाटकात जाते. सांगली जिल्ह्यातील १३० किलोमीटर अंतरातच १०४ गावे, एक महापालिका व औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी या नदीत सोडण्यात येते. गेल्या चाळीस वर्षांत प्रदूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण कृष्णाकाठी वाढल्याचा निष्कर्षही एका अहवालातून पुढे आला आहे. तरीही शासन व प्रशासन निद्रावस्थेत आहे.

 

कृष्णा, वारणा नदीपात्रात तब्बल १६० गावांचे दररोज सुमारे ३०.३५ दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. कृष्णा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या गावांची संख्या १०४ च्या घरात आहे. जिल्ह्यातील १६० गावांमधून जेवढे सांडपाणी दररोज नदीत मिसळते, त्याहून अधिक सांडपाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातून कृष्णा नदीत मिसळते. महापालिका क्षेत्रातून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळत आहे.
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रेड, ऑरेंज व ग्रीन अशा गटांतील ११ हजार ८९४ कारखान्यांचे १ लाख ३३ हजार ५८१ क्युबिक मीटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते.

Manganga

 

देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णेचा उगम पश्चिम घाटात झाला असला तरी याच उगमस्थानापासून काही अंतरापर्यंतच तिची शुद्धता जिवंत राहते. त्यानंतर नदीकाठची शेकडो गावे, साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक उद्योग यांच्या माध्यमातून या पाण्यात विष कालवले जाते. केंद्रीय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध अभ्यास गट, संस्थांनी तयार केलेल्या आजवरच्या अहवालात कृष्णा नदीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली असतानाही त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!