Latest Marathi News

BREAKING NEWS

विनोद तावडे समितीचा अहवाल : भाजपसाठी धोक्याची घंटा

0 946

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल विनोद तावडे समितीने दिला दिल्याने सध्या त्री भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे.

राज्यात लवकरच महापालिकाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुका कधी जाहीर होतील? याबाबत साशंकता आहे. पण लोकसभेची निवडणूक अवघ्या एक वर्षांवर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर राज्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक असणार आहे.

Manganga

 

या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या गोटात तर तुफान हालचाली सुरु आहेत. असं असताना भाजप नेते विनोद तावडे यांच्या सिमितीने सादर केलेल्या एका अहवालामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असा अहवाल समोर आला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने हा अहवाल दिला आहे. 2019 च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा घटणार. भाजपला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात फटका बसणार, असाही उल्लेख विनोद तावडे यांच्या समितीच्या अहवालात केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!