माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : दि. 18 एप्रिल २०२३ : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी चैत्र यात्रेतून चोरट्यांनी हात सफाई करत सोन्याची चैन व बदाम लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, धोंडीराम शंकर बनगर (वय ६४) रा. पुळकोटी ता. माण, जि. सातारा हे खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेला गेले होते. सिद्धनाथ मंदिर परीसरामध्ये ते आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील रक्कम रुपये ६५ हजार किमतीची सोन्याची चैन व बदाम लंपास केले.

याप्रकरणी आटपाडी पोलिसात धोंडीराम बनगर यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह शिंदे करत आहेत.