पुणे : शहरातील नऱ्हे भागातील एका रुग्णायात एका १९ वर्षीय अविवाहीत तरुणीने मुलीला जन्म दिल्यानंतर अर्भक खिडकीतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी तपासाचे निर्देश दिल्याचं देखील सांगितलं आहे.
पुण्यात नऱ्हे भागातील एका हॅास्पिटलमधे १९ वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात मुलीला जन्म देऊन खिडकीतून बाहेर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. नवजात अर्भकाचा यात मृत्यू झाला आहे.

तसेच राज्य महिला आयोगाने सदर प्रकरणात पोलिसांकडून माहिती मागविली आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरु असून याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत.