सध्या दुचाकी वाहन क्षेत्रामध्ये Electric Scooter चा बोलबाला निर्माण होवू लागला आहे. अनेक कंपनीच्या Electric Scooter बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये आपण पाहूया की, कोणती Electric Scooter सर्वोत्तम आहे.
बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या Ather 450X Vs Ola S1 Air या दोन्ही स्कूटर बाबत सविस्तर माहिती आपण पाहूया.

Ather 450X च्या नवीन वेरिएंटची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, नवीन स्कूटरला प्रो पॅकचा लाभ मिळणार नाही. हे 6.4kW मोटर आणि 3.7kWh निकेल-कोबाल्ट-आधारित लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरते.
Ola S1 Air 4.5kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे. ओलाच्या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2kWh, 3kWh आणि 4kWh बॅटरी पॅकचा पर्याय आहे. याशिवाय इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड असे तीन रायडिंग मोडही उपलब्ध आहेत.
आता या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, एथरची प्रमाणित रेंज एका चार्जवर 146km आहे. म्हणजेच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 146 किमी अंतर जाईल. तर ओलाची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर तीन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येते. एका पूर्ण चार्जवर, Ola S1 Air 85km (2kWh), 125km (3kWh) आणि 165km (4kWh) ची रेंज देते.
Ather च्या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 98 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत जाते. दुसरीकडे, Ola S1 Air ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 84 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.त्यामुळे तुम्ही Electric Scooter खरेदी करताना या बाबींचा विचार करून खरेदी करा. (टीप : अधिक माहितीसाठी जवळच्या शोरूमला भेट द्या)