Latest Marathi News

BREAKING NEWS

बिबट्याने केलेल्या हल्यात ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू

0 82

चंद्रपूर : अंगणात झोपलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना सावली वनपारिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चक विरखल येथे घडली.

मंदा एकनाथ सिडाम (५३) रा चक विरखल ता सावली असे मृत महिलेचे नाव आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चक विरखल येथील काही कुटुंब अंगणात झोपले होते. मंदा सिडाम या सुद्धा अंगणात झोपल्या होत्या. मध्यरात्री अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. झटापटीच्या आवाजाने परिसरात झोपलेले इतर नागरिक उठले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. तोपर्यंत मंदा सिडाम यांचा मृत्यू झाला होता.

Manganga

 

याबाबतची माहिती सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बिबट्याचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी विरुटकर यांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!