आटपाडी तालुक्यातील कौठूळी गावाचा सुपुत्र सुकांत कदम याने पुरुष दुहेरीत ब्राझील पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष दुहेरीत प्रमोद भगत च्या जोडीने सुवर्णपदक पटकावले. सोमवारी या दोघांनीही सुवर्ण कामगिरी करून क्रीडाविश्वात नावलौकीक मिळवले आहे.
प्रमोदने एकेरीत रौप्यपदक तर सुकांतने कास्यंपदक जिंकलं आहे. पुरुष दुहेरीत या दोन्ही खेळाडूंनी जू डोंगजे व शिन क्युंग ह्यान या कोरिय जोडीला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर भारताच्या या जोडीने सरळ स्टेटमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने २२-२० व २९-१९ असे गुण मिळवून बाजी मारली.

सुकांतने एकेरीत SL4 कॅटेगरीत ब्रॉंझ मेडल जिंकलं आहे. याविषयी बोलताना सुकांत म्हणाला, मला माझ्या कामगिरीबद्दल आनंद आहे. पण एकेरीत मला खूप जास्त मेहनीत घेण्याची गरज आहे. या स्पर्धेत माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत, याचा मी शोध घेतला आहे. त्या चूका सुधारण्याकडे मला जास्त लक्ष द्यावे लागेल. चूका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.