Latest Marathi News

BREAKING NEWS

 

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का : माजी मुख्यमंत्री यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0 1,045

भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यापाठोपाठ कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही काँग्रेसची साथ धरली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक भाजपा अध्यक्ष अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, सिद्दरामया यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला

 

कर्नाटकात विधानसभा निवडणुकासाठी भाजपाकडूनही उमेदवारांच्या नावांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या. पहिल्या यादीत नाव न आल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नाराज होऊन भाजपाला रामराम ठोकला आणि काँग्रेसचा हात हाती घेतला. त्यापाठोपाठ जाहीर झालेल्या याद्यांमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचं नाव न आल्याने त्यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

“मी मनापासून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, सिद्दरामया, रणदीप सुरजेवाला आणि एम. बी. पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला होता. मी कोणताही विचार न करता येथे आलो आहे”
जगदीश शेट्टर, माजी मुख्यमंत्री

 

Leave A Reply

Your email address will not be published.