माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १६ एप्रिल २०२३ : आटपाडी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी शोएब शेख (रा. पिलीव ता. माळशिरस) याने यातील फिर्यादी बरोबर ओळख वाढवून फिर्यादीस तु मला आवडते, तु माझ्या बरोबर लग्न कर असे म्हणून फिर्यादीच्या किराणामाल दुकानातील कामगाराच्या मोबाईल वरून व्हाटसअप कॉल करून फिर्यादीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्याच बरोबर फिर्यादी राहत असलेल्या रूममध्ये जावून तिचा विनयभंग केला. सदर घटनेबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी शोएब शेख याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.