Latest Marathi News

BREAKING NEWS

आवळाई येथील आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

0 2,159

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १६ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे आत्महत्या केलेल्या ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापगोळा याच्या आत्महत्या प्रकरणी ज्ञानेश्वर पुंजापगोळा याची पत्नी सविता हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जणांवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापगोळा वय ३५ वर्षे मुळ रा बाळगिरी ता अथणी जि. बेळगांव राज्य कर्नाटक सध्या रा सत्यसाई नगर वारणाली विश्रामबाग सांगली जि. सांगली यांना आरोपी नं १ अमित शिंदे २. स्नेहा मगदुम दोन्ही रा सांगली जि सांगली ३ उल्हास मारुती सांळुखे रा दिघंची ता आटपाडी जि सांगली यांनी फिर्यादी व त्यांचे पती यांना दिघंची येथील दुसऱ्याची जमीन दाखवुन फिर्यादीव त्यांचे पती कडुन जमिन खरेदीसाठी ३० लाख रुपये घेवुन त्यांनी फिर्यादी व फिर्यादीचे पती यांची फसवणुक केली होती.

Manganga

तसेच जमिन फिर्यादीचे मयत पती याचे नावावर करुन न देता त्यांनी जमीन खरेदीसाठी घेतलेले ३० लाख रुपये परत न दिल्यामुळे फिर्यादीचे पती यांनी पैशाची त्यांचेकडे वेळोवेळी मागणी केली असता त्यांनी पुन्हा पैशाची मागणी केली तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्यामुळे त्यांचे ञासला कंटाळुन फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर यांनी आवळाई गावाजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावुन घेवुन आत्महात्या केलेली आहे.

याप्रकरणी आटपाडी पोलिसात ज्ञानेश्वर पुंजापगोळा यांची पत्नी सविता पुंजापपोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध कलम ३०६, ४२०, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!