Latest Marathi News

BREAKING NEWS

श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन : ५१०५१ चे प्रथम बक्षीस

0 846

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १६ एप्रिल २०२३ : म्हसवड : दहिवडी (ता. माण) येथे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त 18 एप्रिल रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन दहिवडी नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांनी दहिवडी-गोंदवले रस्त्या लागत केले आहे.

 

तरी सर्व बैलगाडा मालक, चालक यांनी सहभागी व्हा असे आवाहन ॲड.कुणाल बोडके यांनी केले आहे.
या बैलगाडी शर्यती मध्ये पंच राजू जाधव, विजय जाधव, शंकर मुळिक, धनाजी गोसावी, सूरज कदम असणार आहेत. तर झेंडा दर्शक आनंद जगदाळे सर, समालोचक विकास जगदाळे, लालासो ढवाण हे काम पाहणार आहेत.

Manganga

पहिले बक्षीस 51051, दुसरे बक्षीस 31031, तिसरे बक्षीस 21021, चौथे बक्षीस 10010 पाचवे बक्षीस 5050 असणार आहे. त्याच बरोबर मानाच्या ढाली दिल्या जाणार आहेत. सिद्धनाथ यात्रेनिमित्त गेल्या दहा ते बारा वर्षापासून बंद झालेल्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली असल्याचे ॲड. बोडके यांनी सांगितले.

या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक आणि शौकिनांनी या शर्यतीला आपली उपस्थिती लावावी. कोणत्याही बैलगाडी मालकावर या मैदानात अन्याय होणार नाही. सर्व मैदान हे रितसर आणि पारदर्शकपणे पार पाडले जाईल. असे मत ॲड.कुणाल बोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!