माणदेश एक्सप्रेस न्युज : दि.१६ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे आत्महत्या केलेली व्यक्ती ही कर्नाटक राज्यातील असून आवळाई येथे त्याने खरेदी केलेल्या जमिनीत आत्महत्या करण्यापुर्वी चिट्ठी लिहून ठेवल्याने संशय वाढला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कर्नाटक राज्यातील ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापपोळ याने आवळाई येथील शेतजमीन खरेदी केली होती. परंतु सदरची जमीन ही समाईकात असल्याने त्यांना या ठिकाणी जमिन खरेदी करून सुद्धा त्यांना या ठिकाणी वहिवाट करता येत नव्हती.

जमीन खरेदी बाबत त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. याबाबत त्यांनी जमीन खरेदी घेणाऱ्या व्यक्तीकडे तगादा लावला होता. परंतु जमीन खरेदी देणाऱ्या व्यक्तीने सांगली येथील काही लोकांना हाताशी धरून ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापपोळ याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.
या सर्व प्रकरणाला वैतागून ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापपोळ याने आवळाई येथे जी शेतजमीन ( गट नं. १०५१) खरेदी घेतली होती त्या जमिनीमध्येच चिट्ठी लिहून आत्महत्या केली. पोलिसांनी सदर चिट्ठी जप्त केली असल्याचे घटनास्थळा वरून सांगण्यात आले होते. तसेच ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापपोळ याच्या नातेवाईकांनी जो पर्यंत आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याने सांगितल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.