कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनचा ‘शेहजादा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. १७ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ३०.६३ कोटी रुपयांची कमाई केली. पण आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. ‘शहजादा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या ५६ दिवसांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
खुद्द कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओ संदेशाद्वारे याची घोषणा केली आहे. शेहजादा अचानक मध्यरात्रीच ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचं सांगितलं जात आहे. कार्तिक आणि क्रीती दोघांनी एक व्हिडिओ शेअर करत या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “आता काहीही गुप्त ठेवले जाणार नाही.”

१४ एप्रिलला ‘शेहजादा’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला. आता कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा आनंद नेटफ्लिक्सवर घेता येणार आहे. OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी तुमच्याकडे नेटफ्लिक्सचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे. मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही १४९ रुपये भरून एका महिन्याचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता.