शिवाजी पार्कात का बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोन तरुणींसोबत एका तरुणाचं लपूनछपून रिलेशनशिप सुरु होतं. मात्र अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस उपटून आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली आहे. तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींमधील राडा पाहायला मिळत आहे. या चारही कॉलेजमधील असल्याचं पाहायला मिळत आहे.

या तरुणींनी एकमेकींना केस ओढून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका तरुणामुळे या तरुणींमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं जात आहे. ही हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.