एकाच जागी तासनतास बसून काम करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा वाईट सवयी मुळे अनेकांचे वजन मोठ्या प्रमाणत वाढत आहेत. अनेकांना वाढत्या वजनामुळे स्थूलपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक लोक डाएटचा पर्याय निवडतात. वजन नियंत्रणामध्ये यावे याकरिता डाएटसह व्यायामदेखील आवश्यक असतो.
दररोज किमान ३० मिनिटे धावल्याने शरीर योग्य शेपमध्ये राहण्यास मदत होते. असे केल्याने शरीरातील ५०० कॅलरीज बर्न होतात. या वर्कआउटची सुरुवात चालण्यापासून करावी. पुढे हळूहळू चालण्याचा वेग वाढवावा. नंतर धावायला सुरुवात करावी. असे केल्याने शरीरावर दबाव निर्माण होत नाही.

वजन कमी करण्यासाठी स्टेप एक्सरसाइज फायदेशीर ठरतो. हा फार सोपा व्यायाम आहे. घरातील पायऱ्यांवर चढ-उतार केल्याने चांगला व्यायाम होऊ शकतो. यासाठी कोणत्याही अतिरिक्त सामानाची गरज नसते.
सायकल चालवणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. दिवसातून फक्त ३० मिनिटे सायकल चालवल्याने फिट राहायला मदत होते. यामुळे पायाच्या स्नायूंना बळकटी येते.
वजन कमी करण्यासाठी पोहणे खूप आरोग्यदायी समजले जाते. पोहताना संपूर्ण शरीराची हालचाल होत असते. म्हणजेच शरीराच्या प्रत्येक भागाचा व्यायाम होत असतो. ३०-४० मिनिटे पोहण्याचा सराव केल्याने ५०० कॅलरीज सहज बर्न होतात.
टीप : व्यायामाच्या अधिक माहिती साठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, ही केवळ माहिती आहे.)