माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १५ एप्रिल २०२३ : जत : जत तालुक्यातील येळवी येथे 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले अन शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
येळवी येथे औदुंबर विजय जगताप (वय 22) याचे घर गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी तीन च्या सुमारास औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटलला स्वतःचा फोटो ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.औदुंबर विजय जगताप याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जत पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
