Latest Marathi News

BREAKING NEWS

‘KGF 3’ teaser : ‘केजीएफ ३’ चा उत्कंठा वाढविणारा टीझर प्रदर्शित; ‘केजीएफ ३’ची उत्सुकता आणखीनच वाढली

0 1,187

अभिनेता यश चा ‘केजीएफ’ च्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने गेल्या वर्षी रेकॉर्डब्रेक कमाई केली. अखेर ‘केजीएफ-३’चा अनाउन्समेंट टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

१४ एप्रिल २०२२ रोजी ‘केजीएफ २’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तर काल हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष झालं. याच निमित्त आनंद व्यक्त करत या चित्रपटाच्या टीमने एक खास टीझर पोस्ट केला. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात असलेली ‘केजीएफ ३’ची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Manganga

‘केजीएफ २’ मध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून या चित्रपटात पुढे काय होणार याचा अंदाज प्रेक्षक बांधत होते. पण काल प्रदर्शित झालेल्या दोन मिनिटांच्या टीझरमुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कथा एक वेगळंच वळण घेणार आहे हे स्पष्ट झालं. हा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी याला तुफान प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!