Breaking : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात : खासगी बस दरीत कोसळली : १३ जणांचा मृत्यू : मृत्यांचा आकडा वाढण्याची शक्यता?
माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १५ एप्रिल २०२३ : पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाले आहेत.
मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू झांज पथक हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाट ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचं पथकही हजर आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
VIDEO | "At least 13-14 people were found dead. Search and rescue operation are still underway," says a rescue official. The private bus was going from Pune to Mumbai when it fell into the gorge near Shingroba temple on the old Mumbai-Pune highway. pic.twitter.com/CiyMixjaPU
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2023