बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘कहो ना प्यार है’ ते ‘अग्निपथ’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या याच सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘क्रिश’चाही समावेश आहे.
‘क्रिश ३’ २०१३ साली प्रदर्शित झाला होता, त्यानंतर चित्रपटाच्या चौथ्या भागाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाविषयी भाष्य केलं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले की, “मला ‘क्रिश ४’ बनवण्यात अजिबात घाई करायची नाही. चित्रपटाचे शूटिंग २०२४ नंतर सुरू होणार आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर टीम काम करत आहे. त्यानंतर प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू करण्यात येईल.

हृतिक त्याच्या आगामी ‘वॉर २’ या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू करणार आहे. याचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. याबरोबरच हृतिक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटातही झळकणार आहे. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.