Kolhapur politics : धमक होती तर थांबला का नाही? आम.ऋतुराज पाटलांचा महाडिकांच्यावर बिंदू चौकातून हल्लाबोल
कोल्हापुर : सव्वा सात ते साडेसातच्या सुमारास आम्ही दसरा चौकात आलो. सत्तेचा वापर करून त्यांनी आम्हाला दसरा चौकात थांबवले. भीती नव्हती, तर दुर्लक्ष करायला पाहिजे होते. आम्हाला येऊ द्यायला हवे होते, पण महाडिक कंपनी घाबरल्याने त्यांनी पळवाट काढल्याचा हल्लाबोल आमदार ऋतुराज पाटील यांनी केला.
माजी आमदार अमल महाडिक बिंदू चौकात साडे सातला येऊन गेल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास ऋतुराज पाटील यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी महाडिकांवर तोफ डागली. अमल महाडिकांबद्दल मला बोलण्याची गरज नाही, थोरले महाडिकसाहेब येतील तेव्हा आम्ही ताकदीने येऊ. आम्ही शेतकरी मंडळी बास आहेय त्यांना बंटी साहेबांची गरज नाही. घाबरले म्हणून पळवाट काढली, असा टोलाही त्यांनी लगावला.

ऋतुराज पाटील म्हणाले की, दिवस निवडायचा होता, तर चागंला निवडायचा होता. आम्ही पूर्ण ताकदीने येऊ शकलो असतो. आज जयंतीच्या दिवशी पोस्ट टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी महाडिक गटावर केला.