माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १४ एप्रिल २०२३ : जत : जत तालुक्यातील दरीबडची येथे म्हैशी चरावयाला गेलेल्या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन म्हैशी ठार झाल्या. ठार झालेल्या वृद्धाचे नाव संगाप्पा सनाप्पा पुजारी (वय. ७०) असे आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यात दरीबडची येथील संगाप्पाप पुजारी हे म्हैशी चरायला घेऊन गेले होते. पुजारी हे भैरवनाथ मंदिर शिंगे वस्ती या ठिकाणी आले असता वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. त्याच बरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या दोन म्हैशी ठार झाल्या आहे. सदरची घटना जत पोलिसात नोंद असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
