प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड या दोघांच्या नात्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी सायलीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
एका मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आले. यावेळी सायली म्हणाली, ‘आम्ही फक्त मित्र आहोत. या ट्रोलिंगमुळे आमची मैत्री देखील राहिली नाही. ट्रोलिंगचा आम्हाला त्रास झाला आहे.

मी काही दिवसांपूर्वी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केला.तो फोटो मी माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शेअर केला होता. त्या फोटोला लोकांनी ज्या कमेंट केला होत्या, त्या कमेंट वाचून मला भिती वाटू लागली. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय मी पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद केलं पाहिजे.
आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स या टीममध्ये ऋतुराज आहे. या टीमच्या जर्सीचा रंग पिवळा आहे. काही दिवसांपूर्वी सायलीनं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.