IPL 2023 : हॅरी ब्रूक याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 228 धावांचा डोंगर उभारला.
हॅरी ब्रूक याने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने चारी बाजूने धावांचा पाऊस पाडला. हॅरी ब्रूक याने 55 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत ब्रूक याने तीन षटकार आणि 12 चौकार लगावले. हॅरी ब्रूक याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर त्याने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. हॅरी ब्रूक याने माक्ररमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अभिषेक शर्मासोबत चौथ्याविकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. तर पावरप्लेमध्ये मयंक अग्रवालसोबत हॅरी ब्रूक याने 46 धावांची भागिदारी केली. अखेरीस कालसेनसोबत त्याने 11 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली.
हैदराबादचा कर्णधार एडन माक्ररम याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने 26 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. माक्ररम याने या खेळीत पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. माक्ररम याने विस्फोटक फलंदाजी करत हैदाराबादच्या डावाला आकार दिला. आघाडीच्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर माक्ररम याने हॅरी ब्रूकच्या साथीने हैदराबादचा डाव सावरला. हॅरी ब्रूक आणि माक्ररम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. यामध्ये माक्रमरचा वाटा 50 धावांचा होता. तर हॅरी ब्रूक फक्त 20 धावांचे योगदान दिले.
एडन माक्ररम बाद झाल्यानंतर अभिषेख शर्मा याने वादळी फलंदाजी केली. अभिषेक शर्मा याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. अभिषेक शर्मा याने हॅरी ब्रूक याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मा याने झटपट धावा काढल्यामुळे हैदराबादने 200 धावांचा पल्ला ओलांडला.
आंद्रे रसेल याने हैदराबादविरोधात भेदक मारा केला. त्याने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. रसेल याने 2.1 षटकात 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.