माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १४ एप्रिल २०२३ : आटपाडी : महामानवाच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी कर्मभूमी सेवा ग्रुप आटपाडी यांच्या वतीने १८ तास वाचन करूया महामानवास मानवंदना देण्यात आली.
या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, माजी जि.प. सदस्य अरुण बालटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याच्या धामधुमीच्या काळात महामानवाची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करूया असे आवाहन करत हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक, युवक, युवती तसेच लहान मुले यांनी सहभाग नोंदविला.
सदरचा उपक्रम शिक्षक जगदीश खाडे, अक्षय थोरात, मुकेश क्षीरसागर, आसावरी क्षीरसागर, संजय होले, विजय चव्हाण, महेश इंगवले, तुकाराम मुंढे, श्री. वनारसे यांनी राबविला. यावेळी वाचकांनी स्वत: पुस्तके वाचण्यास आणली होती. तर ज्यांना पुस्तके उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. हा उपक्रम श्री दत्त मंदिर पंचायत समिती आटपाडी या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष असिफ मुजावर यांनी महामानवाला वंदना पत्नीसह या उपक्रमाला पाठींबा दिला.