Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : दिघंचीमध्ये महामार्गावरील महापुरुषांच्या नावाचे फलक काढल्याने तणाव

0 4,613

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १४ एप्रिल २०२३ : आटपाडी : तालुक्यातील दिघंची येथील महामार्गावर लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या नावाचे फलक काढण्यात आल्याने दिघंची येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी नागरिकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले.

 

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील दिघंची येथून दिघंची-आटपाडी व दिघंची-झरे असा दुहेरी महामार्ग झाला आहे. या ठिकाणी दिघंची-झरे महामार्गावर चौकामध्ये आण्णाभाऊ साठे चौक, मौलाना आझाद चौक, वेताळा चौक असे फलक लावण्यात आले होते. परंतु आज सायंकाळच्या दरम्यान पोलिसांना सदरची माहिती समजताच त्यांनी ते फलक काढून टाकले.

सदरची बाब ही नागरिकांना समजताच त्यांनी या ठिकाणी धाव घेत अचानक रास्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत कोणाचीही तक्रार नसताना पोलीसांनी बळजबरीने नामफलक काढून टाकल्याने पोलिसांच्या विरोधात ही नागरिक आक्रमक झाले होते.

परंतु नागरिकांना पवित्रा पाहता पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत आहे त्या ठिकाणी नाम फलक लावण्याचे आश्वासन देत नाम फलक लावले. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन माघारी घेतल्याने तणाव निवळला.

यावेळी मंगेश रणदिवे, बळीराम रणदिवे, अविनाश रणदिवे, महादेव रणदिवे, बाबा वाघमारे, सुरज शिंदे, राजू आबा वाघमारे, सुभाष बनसोडे, सतीश रणदिवे, सुरज पठाण, अमित वाघमारे, विजय जावीर, सुधीर जावीर, अजित रणदिवे, अजित रणदिवे, गोपीचंद रणदिवे, पंकज जावीर, शेखर रणदिवे, ताजुद्दीन झारी, महेंद्र वाघमारे, जाफर सय्यद आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

दिघंची येथील महामार्गावर असणाऱ्या स्ट्रेट लाईटच्या डांब यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी विद्युत रोषणाई काढण्याची सुरुवात केल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडले.

Leave A Reply

Your email address will not be published.