प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वांनाच भूक लागते. माणूस कष्ट करुन धान्य विकत घेतो तर, प्राणी जंगलात अन्न शोधतात किंवा शिकार करुन खातात. मात्र काही पाळीव प्राणी हे माणसांवरच अवलंबून असतात.
काहीजण या प्राण्यांना सहज मदत करताना आणि त्यांना खाऊ घालतानाही दिसतात. मात्र समाजात काही असेही लोक असतात जे मदत तर नाहीच पण उलट अशा प्राण्यांना त्रास देण्यात नेहमी पुढे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घराच्या छतावर माकडांना खाण्यासाठी भाकरी ठेवली आहे. हे पाहून माकड खूश होतो आणि ती भाकरी खाण्यासाठी छतावर उडी मारतो. ते माकड जसं भाकरी उचलतं तस त्यासोबत सापही त्याच्या अंगावर येतो. हे पाहून माकड घाबरतो आणि भाकरी हातातून टाकून देतो आणि लांब होतो.
मात्र व्हिडीओमध्ये दिसणारा साप हा खराखुरा नसून एका तरुणाने माकडाला त्रास देण्याच्या हेतूनं भाकरीला एका धाग्याच्या मदतीने तो नकली साप बांधला होता. प्राण्यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी हे केले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.