Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : कुरंदवाडी जवळ झालेल्या अपघतामध्ये जत येथील एकजण ठार

0 997

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १३ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे-कुंदरवाडी रोडवर घोरपडे वस्ती येथे झालेय अपघातामध्ये जत तालुक्यातील रेवणाळ येथील एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सखाराम धुळा वाघमोडे हे (वय 55, रा. चांदणी चौक रेवणाळ, ता. जत) हे मोटारसायकल (क्र. MH-10-AJ-5782) वरून कुरुंदवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेवून परत रेवणाळ कडे जात असताना झरे-कुरुंदवाडी रोड वरील घोरपडे वस्ती जवळ आले असता आरोपी विष्णू सुभाष खोत रा. विजयनगर सांगली हा त्याच्या ताब्यातील ट्रक्टर (क्र. MH-10-DV-6836) भरधाव वेगाने चालवून सखाराम वाघमोडे यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये सखाराम वाघमोडे यांच्या मृत्यू झाला तर शामराव बंडगर हे जखमी झाले. सदरची घटना हि आज दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

Manganga

या अपघात प्रकरणी भगवान धुळा वाघमोडे यांनी आटपाडी पोलिसात आरोपी विष्णू सुभाष खोत याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस्त करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!