Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली : आयटीआय येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून खून

0 1,050

माणदेश एक्सप्रेस न्युज :दि. १३ एप्रिल २०२३ : सांगली : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या तरुणाचा पाठलाग करुन खून करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वसंतदादा साखर कारखाना परिसरात घडला.

याप्रकरणी तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. राजवर्धन राम पाटील (वय १८ रा. मतकुणकी ता.तासगाव) याच्यावर पाळत ठेऊन कारखान्याच्या प्रवेशद्वारावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यातून बचावासाठी तो पळून जात असताना पाठलाग करीत धारदार हत्याराने वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Manganga

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मयत राजवर्धन पाटील हा वसंतदादा औद्योगीक वसाहतमधील आयटीआयच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. दोन दिवसांपूर्वी राजवर्धन आणि हल्लेखोरांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून वाद झाला होता.

राजवर्धन पाटील हा गुरुवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर कारखान्यासमोर असणार्‍या बस थांब्याकडे तो कारखान परिसरातून चालत निघाला होता. यावेळी हल्लेखोर देखील त्याचा माग काढत या परिसरात आले. यावेळी राजवर्धन व हल्लेखोरांमध्ये एकमेकांकडून रागाने बघण्याचा कारणातन जोरदार वादावादी करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

 

त्यामुळे राजवर्धन याने बचाव करण्यासाठी कारखान्याकडे पळ काढला. परंतु संशयितांनी त्याचा पाठलाग करून मानेवर आणि छातीवर दोन ठिकाणी कोयता सदृष्य हत्याराने हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने राजवर्धन याचा जागीच मृत्यू झाला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!