नावातच “शिव” असल्याने सभासदांची “कृपा” होणार : राजेंद्र खरात : म्हसवड येथे शिवकृपा पतपेढीचा सभासद प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १३ मार्च २०२३ : म्हसवड : नावातच शिव असल्याने सभासदांची कृपा शिवकृपा पतपेढीवर होत असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी व्यक्त केले. ते म्हसवड येथे शिवकृपा पतपेढीच्या सभासद प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. यावेळी शिवकृपाचे उपाध्यक्ष वसंत चव्हाण, संचालक सर्वश्री बबन काटे, श्री.भोसले, श्री.तुपे, श्री.बोराडे, श्री.वरुडे यांच्यासह संस्थेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेंद्र खरात म्हणाले, इतर संस्थेमध्ये प्रामुख्याने हिटलरशाही असते. परंतु शिवकृपाचे सर्व संचालक हे शांत, संयमी व देवमाणसेच आहेत. संस्थेमध्ये सभासद कर्ज किती घेतो? यायापेक्षा तो सभासद कर्ज कसे फेडतो हे प्रामुख्याने शिवकृपा पतपेढी पाहते. त्यामुळे सभासद यांनी घेतलेले कर्ज वेळेत फेडले पाहिजे असे ते म्हणाले. तसेच संस्थेचे सर्वच कर्मचारी हे सभासदांशी नाते जपण्याचे काम करत असल्याने पतपेढीला कोणतीही अडचण येणार नसल्याने त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये लवकरच आटपाडी शहरामध्ये शिवकृपा पतपेढीची शाखा सुरु करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संस्थेचे उपाध्यक्ष वसंत चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत कोरेगाव येथे संस्थेचे निवासी प्रशिक्षण केंद्र असून या ठिकाणी वेगवेगळी आभ्यास शिबीर आयोजित करण्यात येत असून आठवड्यातून एकदा संचालक मंडळाची बैठक संपन्न होत असल्याने याचा फायदा सभासदांना होत असल्याने त्यांनी यावेळी संगितले.
तर, सभासदांनी संस्थेबद्दल मनोगत व्यक्त करत संस्थेने केलेल्या मदतीची जाणीव करून दिली. तर ठेवीदारांनी संपूर्ण संस्थेचा अभ्यास करूनच या ठिकाणी विश्वासाने ठेवी ठेवल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष वसंत चव्हाण व संचालक मंडळ यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी तर आभार वसुली अधिकारी शंकर शिंदे यांनी मानेल. कार्यक्रमास मोठ्या संस्ख्येने सभासद उपस्थित होते.