कुख्यात गँगस्टर अतीक अहमदच्या मुलाचे आणि आणखी एका शूटरचं एन्काऊंटर करण्यात आले आहे. उमेश पाल खून प्रकरणात तो मुख्य अतीक अहमदचा मुलगा मुख्य आरोपी होता. याच प्रकरणात गुलाम नावाचा शूटर सह-आरोपी होता. त्याचाही एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने झाशीमध्ये ही कारवाई केली. या दोघांकडून परदेशी बनावटीची शस्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत.
या एन्काऊंटर संबंधित माहिती देताना उत्तर प्रदेश पोलीस म्हणाले की, अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनाचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Former MP-Atiq Ahmed's son Asad and his aide killed in an encounter by UP Police in Jhansi
The two were wanted in the Umesh Pal murder case pic.twitter.com/FEBHQw6NVn
— ANI (@ANI) April 13, 2023