Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी बाजार समितीसाठी भाजप कडून गाव भेट दौरे, बैठका सुरु

0 789

माणदेश एक्स्प्रेस न्यूज : दि. १३ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवावादी काँग्रेस यांनी मोर्चे बांधणी सुरु केली असून या भाजप कडून गाव भेट दौरे व बैठका सुरु झाल्या आहेत.

यावेळी दिघंची गटातील विठलापुर, उंबरगाव, पळसखेल, लिंगीवरे, राजेवाडी, दिघंची येथे गावभेटी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बाजार समितीवर माजी आम. राजेंद्रआण्णा देशमुख गटाची एकहाती सत्ता होती. परंतु राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपचेच गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक ही पडळकर-देशमुख गट एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वबळावर तयारी सुरु केली असून सर्वपक्षीय निवडणूक अंतिम क्षणी बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Manganga

दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच दिवस होता. अर्ज छाननी मध्ये ०८ अर्ज नामंजूर करण्यात आले तर १५९ अर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातुन ६९ अर्ज मंजूर तर ४ अर्ज नामंजूर झाले. सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातुन १५ अर्ज मंजूर तर १ अर्ज नामंजूर झाला. सहकारी सास्न्था इ.मा. प्रवर्ग मतदार संघातुन ५ अर्ज मंजूर तर १ अर्ज नामंजूर झाला. सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मतदार संघातुन ८ अर्ज मंजूर तर १ अर्ज नामंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातुन २० अर्ज मंजूर झाले. ग्रामपंचायत अनु.जाती-जमाती राखीव मतदार संघातुन १० अर्ज मंजूर झाले.
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातुन ९ अर्ज मंजूर तर ०१ अर्ज नामंजूर झाला. हमाल व तोलाईदार मतदार संघातुन ०५ अर्ज मंजूर झाले. तर एकूण १५९ उमेदवारांचे अर्ज मंजूर व ०८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात झाले. २० एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!