पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते. या अंकांमधील माहिती आयकर विभाग ट्रॅक करत असते. हे लक्षात घेऊन विभाग प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड जारी करतो. मात्र, पॅन कार्डवर लिहिलेले क्रमांक समजणारे किंवा ओळखणारे फार कमी लोक आहेत. आम्ही तुम्हाला पॅन कार्डवर लिहिलेल्या अल्फान्यूमेरिक नंबरचा अर्थ काय असतो ते सांगत आहोत.
पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवते. इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवते. यासाठीच अकाऊंट नंबर मध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.

पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते.